Sunday, April 12, 2026

जन्मदाता

                जन्मदाता

नांगर ओढू ओढू बैलाला लागते जवा धाप, 

तवा मले त्याच्या मंदी दिसतो माझा बाप  " १ "


माय मही सांगत होती, होता जवा तू लहान. 

दुष्काळाचे दिस होते, भागत नव्हती तहान. 

बाप तुझा वाटी भर दुधासाठी, राहिला होता गहाण. 

तवा मले वाटी मंदी दिसतो माझा बाप  "२"


घर दार पोसण्यासाठी राब राब राबं 

ऊन वारा पाऊस पाणी याचे नसे त्याला भान  

रगताचे पाणी करून कष्टाला नसे कधी माप, 

तवा मले ठायी ठायी दिसतो माझा बाप  "३"


एक एक गोट जवा, माय सांगत जाते, 

आतड्याला पिळ पडून, अंग लाही लाही होते.

बापासाठी, बापसाठी देवाकडे मागतो एक दान. 

तुझ्याहून मोठा कर, माझा जन्मदाता बाप, "४"

हा जन्मदाता बाप....


नांगर ओढू ओढू बैलाला लागते जवा धाप, 

तवा मला त्याच्या मंदी दिसतो माझा बाप 

रे दिसतो माझा बाप



📚🖋️  राहुल मोरे 

९४२१६१२९७९

No comments:

Post a Comment

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...