Showing posts with label Market मराठी कविता. Show all posts
Showing posts with label Market मराठी कविता. Show all posts

Sunday, April 12, 2026

Kavita मार्केट

            मार्केट


रक्ताचं पाणी करून माल सारा पिकवायचा 

त्याचं मोल करण्यासाठी बाजार दारी आणायचा


धाकटी नटी पोरं सुद्धा मर मर मरायची 

फाटके तुटके कापड आवरत उद्याची स्वप्न पाहायची 


मार्केटला जोंधळा ज्वारीची बैलगाडी जायची 

केविलवाण्या नजरेने पोरं बापाकडे पहायची 


माल विकायला गेल्यावर छटाक भजी मिळायची 

ठसका लागूस्तवर मग अधाश्या सारखी गिळायची 


बोळकं झालेला बाप सुद्धा आशेन दारातून पहायचा 

येताना मला बी आण आशेल्या नजरेने सांगायचा 


शेतीमालाचं जवा बाजारात मोल व्हायचं 

हाती आलेली रक्कम पाहून बापाचं टकूर फिरायचं 


बोटावर गणित जुळवत बाप लाल डोळ्यांनी घरी यायचा 

रब्बी हातातून गेलं म्हणून खरिपाच स्वप्न पाहायचा 


जगण्यासाठी त्याची धडपड अशी रोजच चालायची 

बैल गाभण दहावा महिना म्हणत फक्त मान डोलायची


रोजचंच रडगाणं बापाच्या नशिबी आलं 

जगाला पोसण्यात आख्ख आयुष्य गेलं


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...