Sunday, April 12, 2026

Kanya कविता

      कन्या


इटूकले पिटूकले पावलं टाकत

छुम छुम करीत येते

दिवसभराचा क्षिणभाग 

क्षणात पळवून नेते


घरी आल्यावर सर्वात आधी 

तीच असते दारात

पप्पा आले म्हणून सर्वांना 

दवंडी देते जोरात


कन्या म्हणजे घराचं वैभव असतं 

कन्येशीवाय घर नुसतं स्मशान भासतं 


पणती बनुन तिचा

दोन घरी प्रकाश

माहेरवाशीण असते तेव्हा

तिला ठेंगणे पडते आकाश


सारं मीच करेन हा तीचा 

नेहमीच असतो हट्ट

नात्यांमध्ये मायेची विण घालून

त्याला बांधून ठेवते घट्ट



📚🖋️ राहुल मोरे 

9421612979

Kavita मार्केट

            मार्केट


रक्ताचं पाणी करून माल सारा पिकवायचा 

त्याचं मोल करण्यासाठी बाजार दारी आणायचा


धाकटी नटी पोरं सुद्धा मर मर मरायची 

फाटके तुटके कापड आवरत उद्याची स्वप्न पाहायची 


मार्केटला जोंधळा ज्वारीची बैलगाडी जायची 

केविलवाण्या नजरेने पोरं बापाकडे पहायची 


माल विकायला गेल्यावर छटाक भजी मिळायची 

ठसका लागूस्तवर मग अधाश्या सारखी गिळायची 


बोळकं झालेला बाप सुद्धा आशेन दारातून पहायचा 

येताना मला बी आण आशेल्या नजरेने सांगायचा 


शेतीमालाचं जवा बाजारात मोल व्हायचं 

हाती आलेली रक्कम पाहून बापाचं टकूर फिरायचं 


बोटावर गणित जुळवत बाप लाल डोळ्यांनी घरी यायचा 

रब्बी हातातून गेलं म्हणून खरिपाच स्वप्न पाहायचा 


जगण्यासाठी त्याची धडपड अशी रोजच चालायची 

बैल गाभण दहावा महिना म्हणत फक्त मान डोलायची


रोजचंच रडगाणं बापाच्या नशिबी आलं 

जगाला पोसण्यात आख्ख आयुष्य गेलं


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Kavita नवी आशा

 नवी आशा


नवीन वर्ष आले 

नवे स्वप्न घेऊनी

गत वर्षीच्या जुन्या 

आठव उरी ठेऊनी


हेवे दावे मद मत्सर

गत वर्षा संग जाऊद्या

कडू गोड आठवणी

शिदोरी म्हणून जपुया


नवे स्वप्न नवी आशा

मनी बंधुभाव जपूया

नव वर्षा स्वागत करण्या 

एक दिलाने सर्व राहूया


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९


Kavita भ्रष्ट राजकरण

     भ्रष्ट राजकारण

आघाडी आणि पिछाडी ही जनतेची दिशाभूल आहे 

सत्तापीपासून लोकांची ही वेगळी चूल आहे 


मतदारांच्या भावनेशी खेळून लोकशाहीचा आव आणायचा 

ईव्हीएम खरेदी करून विजय खेचून घ्यायचा

 

इथ नाही तिथं नाही साऱ्या देशात हेच चाललंय 

जनतेनेही आता दगडांना देव मानलय 


नको त्या दगडांना ईव्हीएम शेंदूर लावतोय 

खऱ्याखुऱ्या देवांना देवळातून बाहेर काढतोय 


माणुसकीचा गहिवर कुठेतरी आटताना दिसतोय 

काना खांद्यावर बंदूक ठेवून माणूस विकला जातोय 


हा सारा बेबनाव, नैतिकतेतच खोट आहे 

संविधान आणि लोकशाहीचा मात्र गळा घोट आहे 


नीतिमत्ता गहाण ठेवून ओरबाडलेला विजय नको 

न घटनेची कत्तल करणारा हा असा अजय नको


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Mitra Marathi Kavita



        मित्र

गाऊ किती थोरवी

मित्रा, गाऊ किती थोरवी 

कृष्ण तू कर्ण तू 

बेईमान या जगी 

अधर्मातील धर्म तू !

कृष्ण तू कर्ण तू 

अधर्मातील धर्म तू



स्थान माझे या जगी 

शून्य रे अमान्य रे 

काळोख्या दुनियेत

असे कवडसा तू !

कृष्ण तू कर्ण तू 

अधर्मातिल धर्म तू 



वनवा पेटला उरी 

धगधगत्या ज्वाले परी 

अलगत त्यावरी

हळवी फुंकर तू !

कृष्ण तू कर्ण तू 

अधर्मातील धर्म तू



वेढलो की मी असा

यवनी हा पुरंदर

तोडण्या हा विळखा 

मावळा तू धुरंदर !

कृष्ण तू कर्ण तू 

अधर्मातील धर्म तू 



नाव ही दर्यावरी  

हेलकावते जरी 

दिशादर्शकातील 

नितळ पारा तू !

कृष्ण तू कर्ण तू

अधर्मातील धर्म तू


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...