Monday, November 3, 2025

Aaj Sarkha Ekant (Prem Kavita)

 


आज सारखा एकांत 

(प्रेम कविता) 


आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही 

जे सांगायचे होते, ते तुला कधी कळलेच नाही 

चार वर्षाची तपश्चर्या माझी, 

फळ मला कधी देणार होतीस ?

जन्मोजन्मीची खून गाठ म्हणे ही, 

बांधता बांधता या जन्मी बांधलीच नाही 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही 


जन्मोजन्मीचे तुझे हे रडगाणे 

ऐकता ऐकता कान ही इटले 

सांध सांधता हृदय ही फाटले 

गळा हार घालण्यासाठी हात उरलेच नाही. 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही 


दोघांच्या त्या सहवासात विर्जन 

निर्जन वाटेवरील तो दुरावा 

कसा हा तुझ्या माझ्या नशिबी आला 

नशिबाला दोष देण्यात वेळ कळलाच नाही. 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही. 


बरे असो त्वा भरतारी जीवन 

मजही सहानुभूती नको तुझी 

सुखी असो तू, हीच मनीषा माझी. 

एवढे सारे सांगून डोळे पाणवलेच नाही. 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही. 

जे सांगायचे होते ते तुला कधी कळलेच नाही.

 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही.


 

📚🖋️ राहुल मोरे 

      ९४२१६१२९७

Sunday, November 2, 2025

Chatak Pakshi

 



चातक


पेर पेगु नारा

देतो हा बिचारा 

वाजवितो पावा 

करीतसे धावा "१"


एक एक थेंबासाठी

झाला कासाविस 

हरिनाम जप

करी रात्रंदिस "२"


वरुणाचा थेंब 

त्याचा आत्मा कोंब 

दाही दिशा मंदी 

उसळला डोंब "३"

 

पेरक्या ईनंती 

करी त्याची खरी 

न फुटे पाझर 

त्याची न्येत बुरी "४"

 

ये मेघा जोमानं 

दे रे जीवदान 

सैर भैर झालो 

पुरव तू आन "५"


वागनुक तूही 

अशी कशी आहे 

मी तर बिचारा 

अपराध साहे "६"



📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Saturday, November 1, 2025

Bail Marathi Kavita

 



 बैल

 

कुणब्याच पंचप्राण 

महादेवाचा मी नंदी 

घरात नसे मिरची  

नाही कमी केली चंदी 


माझ्या राजाचं हे रीन 

फेडू तरी मी रे कसं 

महादेव रे तो माझा 

वाहन मी त्याचं जसं 


पोळ्याच्या सना सुदी

माझा केवढा तो थाट 

अंगावर रेशीम झुल 

तिला शोभे जरी काट 


रंगी बेरंगी केली शिंगे 

त्याला चमकी बेगड

वाटे राजा मी इथला

गोठा माझा राजगड


करू धन्याची चाकरी

फेडावया त्याचं रिन 

येऊ देरे देवा मला 

त्याच्याच दारी मरण


आलं आधुनिक तंतर

गेला माझा तो रुबाब

कसायाच्या दारी बांधी

नाही राहिली माझी आब


एक इनंती ऐक राजा

नको करू हेळसांड 

मोडलेला तो रे डाव 

पुन्हा नव्याने रे मांड....

पुन्हा नव्याने रे मांड...


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...