Showing posts with label Chakravyu मराठी कविता. Show all posts
Showing posts with label Chakravyu मराठी कविता. Show all posts

Sunday, April 12, 2026

चक्रव्यूह marathi kavita

           


चक्रव्यूह


काय करावं कसं करावं, काही कळत नाही 

आयुष्याचे गणित मात्र, जुळता जुळत नाही 


एक शिवले की, दुसरं उसवत जातं 

हरेक शिवायला, धागा काही मिळत नाही


एक संकटाचा डोंगर, पार केला न केला 

यक्ष म्हणून दुसरं, उसंत काही मिळत नाही


उमेदीने सारं विसरून, पुन्हा लढावं म्हणतो 

पण तीच गुल तीच काडी, घास काही गिळत नाही


येरे माझ्या मागल्या, म्हणून आयुष्य रेटावं

सुख शोधण्या नजर, खिळता खिळत नाही


चक्रव्यूहात अडकलेला, निश्चल अभिमन्यू मी

मुक्ती देण्या शोधतो, जयद्रथही मिळत नाही


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...