Showing posts with label Mitra मराठी कविता. Show all posts
Showing posts with label Mitra मराठी कविता. Show all posts

Sunday, April 12, 2026

Mitra Marathi Kavita



        मित्र

गाऊ किती थोरवी

मित्रा, गाऊ किती थोरवी 

कृष्ण तू कर्ण तू 

बेईमान या जगी 

अधर्मातील धर्म तू !

कृष्ण तू कर्ण तू 

अधर्मातील धर्म तू



स्थान माझे या जगी 

शून्य रे अमान्य रे 

काळोख्या दुनियेत

असे कवडसा तू !

कृष्ण तू कर्ण तू 

अधर्मातिल धर्म तू 



वनवा पेटला उरी 

धगधगत्या ज्वाले परी 

अलगत त्यावरी

हळवी फुंकर तू !

कृष्ण तू कर्ण तू 

अधर्मातील धर्म तू



वेढलो की मी असा

यवनी हा पुरंदर

तोडण्या हा विळखा 

मावळा तू धुरंदर !

कृष्ण तू कर्ण तू 

अधर्मातील धर्म तू 



नाव ही दर्यावरी  

हेलकावते जरी 

दिशादर्शकातील 

नितळ पारा तू !

कृष्ण तू कर्ण तू

अधर्मातील धर्म तू


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...