बैल
कुणब्याच पंचप्राण
महादेवाचा मी नंदी
घरात नसे मिरची
नाही कमी केली चंदी
माझ्या राजाचं हे रीन
फेडू तरी मी रे कसं
महादेव रे तो माझा
वाहन मी त्याचं जसं
पोळ्याच्या सना सुदी
माझा केवढा तो थाट
अंगावर रेशीम झुल
तिला शोभे जरी काट
रंगी बेरंगी केली शिंगे
त्याला चमकी बेगड
वाटे राजा मी इथला
गोठा माझा राजगड
करू धन्याची चाकरी
फेडावया त्याचं रिन
येऊ देरे देवा मला
त्याच्याच दारी मरण
आलं आधुनिक तंतर
गेला माझा तो रुबाब
कसायाच्या दारी बांधी
नाही राहिली माझी आब
एक इनंती ऐक राजा
नको करू हेळसांड
मोडलेला तो रे डाव
पुन्हा नव्याने रे मांड....
पुन्हा नव्याने रे मांड...
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९

Nice
ReplyDelete👌👌
ReplyDeleteआपल्या कविता खुप छान आहेत
ReplyDeleteसुंदर लेख आहे
ReplyDeleteसुंदर लेख आहे
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteखूप सुंदर सर.... प्रमोद सावंत
ReplyDeleteकुणब्याचं वास्तव👍
ReplyDeleteअप्रतिम👌👌👌
ReplyDeleteVerry nice 👍
ReplyDeleteकविता खूप छान आहे.
ReplyDeleteVery nice poem
ReplyDelete