Friday, October 24, 2025

Shetakari Kavita

 



      शेतकरी 

 

आल्या पावसाच्या सरी 

सुखावला शेतकरी 

सुखावला शेतकरी 

करी मातीची चाकरी


बीज पेरले मातीत 

गाणं गाईला खुशीत 

गाणं गाईला खुशीत 

भाळ धन्याचे लिहीत 


बीज टरारून आले 

भाळी नशीब कोरले 

भाळी नशीब कोरले 

स्वप्न उद्याचे पाहीले 


पीक नाचते कुदते 

जरा पाठीत मोडते 

जरा पाठीत मोडते 

गंध वाऱ्यात सोडते 


माझा शेतकरी राजा 

रक्त आटून राबवतो 

रक्त आटून राबवतो 

पीक मोत्याचे काढतो


हिर्वी गार पाने फुले 

भरी मोतीयाची दाणे 

भरी मोतीयाची दाणे 

पीक आले जणू सोने 


रिप रिप चिखलात 

पाय रुतून बसते 

पाय रुतून बसते 

दारी मरण दिसते


त्याच्या नशिबी यातना 

घोर कष्टाचे हे जिणे 

घोर कष्टाचे हे जिणे 

भार जगाचा वाहने



📚🖋️  राहुल मोरे 

         ९४२१६१२९७९

7 comments:

  1. सुंदर! सर 😊

    ReplyDelete
  2. शेतकरी राजा साठी छान कविता

    ReplyDelete
  3. सुंदर सर

    ReplyDelete
  4. शेतकर्‍याची अतिशय समर्पक शब्दात व्यथा मांडली आहे... सरजी 🙏

    ReplyDelete
  5. आपण या कवितेतून शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तव चित्र मांडले आहे.

    ReplyDelete

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...