शेतकरी
आल्या पावसाच्या सरी
सुखावला शेतकरी
सुखावला शेतकरी
करी मातीची चाकरी
बीज पेरले मातीत
गाणं गाईला खुशीत
गाणं गाईला खुशीत
भाळ धन्याचे लिहीत
बीज टरारून आले
भाळी नशीब कोरले
भाळी नशीब कोरले
स्वप्न उद्याचे पाहीले
पीक नाचते कुदते
जरा पाठीत मोडते
जरा पाठीत मोडते
गंध वाऱ्यात सोडते
माझा शेतकरी राजा
रक्त आटून राबवतो
रक्त आटून राबवतो
पीक मोत्याचे काढतो
हिर्वी गार पाने फुले
भरी मोतीयाची दाणे
भरी मोतीयाची दाणे
पीक आले जणू सोने
रिप रिप चिखलात
पाय रुतून बसते
पाय रुतून बसते
दारी मरण दिसते
त्याच्या नशिबी यातना
घोर कष्टाचे हे जिणे
घोर कष्टाचे हे जिणे
भार जगाचा वाहने
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९

सुंदर! सर 😊
ReplyDeleteशेतकरी राजा साठी छान कविता
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteसुंदर सर
ReplyDeleteखूप छान👍👍
ReplyDeleteशेतकर्याची अतिशय समर्पक शब्दात व्यथा मांडली आहे... सरजी 🙏
ReplyDeleteआपण या कवितेतून शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तव चित्र मांडले आहे.
ReplyDelete