Thursday, October 30, 2025

Hirav Jaga Kavita

 


 हिरव जग


दुर देशीच्या रे राजा,

बघ दुरून हे जग

हीर्व्या राव्याला नग फसू, 

त्यात आटली काळजाची रग


हे खेड्यातल जग, 

बघ राजा दुरून 

माया आपुलकी तूही 

बघता जाईल सरून 


जिवा भावाचे मैतर, 

सोन्या-चांन्या जोडीला.

ट्रॅक्टर टरकाची नाही सव 

माझ्या त्या काळया माडीला 


पांढरा धोट शाळू 

दूर देशी रे जातो 

पाण्या पावसानं भिजलेलं 

राजा डिस्को रे आम्ही खातो 


घोर कष्टाचे हे जिणे 

आमच्या रे भाळी 

रक्ताचं पाणी कराया 

बापा मांग लेकाची रे पाळी 


दिस उगवला तसा 

बैल घाण्याला जुंपला 

कोदा उपसु उपसू 

शेवटी म्हसणी खपला



📚🖋️ राहुल मोरे 

      ९४२१६१२९७९

5 comments:

  1. सुंदर लेख आहे

    ReplyDelete
  2. सुंदर लेख आहे

    ReplyDelete
  3. छान कविता आहे

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर विचार . अप्रतिम कविता

    ReplyDelete
  5. खूपच छान तुमची कविता वाचताना अक्षरशः ग्रामीण भाग डोळ्यासमोर उभा राहत

    ReplyDelete

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...