हिरव जग
दुर देशीच्या रे राजा,
बघ दुरून हे जग
हीर्व्या राव्याला नग फसू,
त्यात आटली काळजाची रग
हे खेड्यातल जग,
बघ राजा दुरून
माया आपुलकी तूही
बघता जाईल सरून
जिवा भावाचे मैतर,
सोन्या-चांन्या जोडीला.
ट्रॅक्टर टरकाची नाही सव
माझ्या त्या काळया माडीला
पांढरा धोट शाळू
दूर देशी रे जातो
पाण्या पावसानं भिजलेलं
राजा डिस्को रे आम्ही खातो
घोर कष्टाचे हे जिणे
आमच्या रे भाळी
रक्ताचं पाणी कराया
बापा मांग लेकाची रे पाळी
दिस उगवला तसा
बैल घाण्याला जुंपला
कोदा उपसु उपसू
शेवटी म्हसणी खपला
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९

सुंदर लेख आहे
ReplyDeleteसुंदर लेख आहे
ReplyDeleteछान कविता आहे
ReplyDeleteअतिशय सुंदर विचार . अप्रतिम कविता
ReplyDeleteखूपच छान तुमची कविता वाचताना अक्षरशः ग्रामीण भाग डोळ्यासमोर उभा राहत
ReplyDelete