कुणब्याचे अभंग
देवनी धाडना, उघडा वाढना
कष्टात सडना, शेतकरी
जगना पोशिंदा, कुंबिकिना धंदा
खावलाना वांधा, कर्जा पायी
सावकार लुटे, सरकार रुठे
जावो तरी कोठे, पोट पायी
धरती रूठनी, आकासना साठे
गायनात पाटे, ह्या चाकना
मर मर मरू, बच्चा कच्चा पायी
हातम्हा न काही, कधी लागे
उगवना दिस, जाई तो कामम्हा
जयना कोमम्हा, मनोमनी
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९

फारच छान.
ReplyDeleteमायबोलीत खूप छान मांडणी👍👍
ReplyDeleteचांगलीच आहे
ReplyDeleteएक नंबर 🙏🙏🙏
ReplyDeleteGood 👍
ReplyDelete