हेमंत
अंकुरली कोंब
कोंब, दवा दवांनी
आदित्यान केली रास
आपुल्या त्या किरणांनी "१"
माय माउली कशी
वसंता सम बहरली
भाळी लावून कुंकूम
जशी नवरी सजली "२"
पांघराला हिरवा शालू
तृण गालिचा घेऊन
मदनाची आली रती
प्याला मद्या चा पिऊन "३"
नशा वेगळीच हेमंताची
गार थंडीची ती सुरखी
वाटे न धरतीला ' मी '
पोरा सोरा वाचून पोरकी "४"
उषेच्य ना-ना कला
कला एकेक उमलती
काक कोकिळेच्या मनी
रास क्रिडा उमलती "५"
दिसा मागून दिस
दिस एकेक गणतीला
आठवणी साऱ्या साऱ्या
माझ्या हो संगतीला "६"
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९

खूपच सुंदर
ReplyDeleteखूपच छान 👍
ReplyDeleteखूपच सुंदर कवीता 👍
ReplyDeleteखूप सुंदर कविता आहे.
ReplyDeleteछान रचना
ReplyDeleteखूपच छान सर जी 👍👍👍
ReplyDeleteछान कविता 👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर आहे कविता👍👌👌
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteसुंदर आहे
ReplyDelete