आत्महत्या
हाडांचा सापळा होऊन
खांद्यावर मणभराचा नांगर,
काबाड कष्ट करतो
शेतकरी बाप माझा.
कोरभर तुकड्यासाठी
रक्ताच पाणी,
देह गहाण ठेवतो
मीठ मिरची पाई.
डोक्यावर कर्जाचे ओझं महामुर झालं
पावसानं पाठ दावली,
शासनानं टांग वर केली
म्हणून..
गळा फास जवळ करतो
शेतकरी बाप माझा
लांड्या बांधावरच्या बाभळीला
लटकलेलं बापाचं भूत
खाली काढायला,
जमलेत सारे पांढरे कावळे
अन् मेल्यावर...
जगाचा पोशिंदा म्हणून
हिणवायला.
कवड्या गोट्या फेकावे
तसे आश्वासन फेकून गेलेत.
ती हाती यायच्या आतच
हवेत विरून गेलीत.
अचानक वावटळ उठावी
अन् काही क्षणात विरून जावी
अगदी तसा..
माझा शेतकरी बाप,
विरून गेला मनामनातून....
साऱ्यांच्याच.....
कायमचा....
अगदी मायच्या बी....
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९

सुंदर रचना
ReplyDeleteभावपूर्ण कविता. छान.
ReplyDeleteखूपच छान चालू परिस्थिती प्रमाणे आहे
ReplyDeleteवास्तवदर्शी कविता
ReplyDeleteChan
ReplyDelete