Thursday, February 26, 2026

माय मराठी kavita

        


    माय मराठी 


श्वास मराठी, ध्यास मराठी

धमन्यांमध्ये वसे मराठी 

जन्मताच जी आली ओठी 

ती माय मराठी माय मराठी 


माळरानीचा वात मराठी 

दऱ्याखोऱ्यात गुंजे मराठी 

सह्यगिरीचे शिखर मराठी

माय मराठी माय मराठी


ज्ञानोबाची ओवी मराठी

तुकोबाची गाथा मराठी

भागवताचा खांब मराठी

माय मराठी माय मराठी

 

शिवबाची तलवार मराठी 

मावळ्यांची ललकार मराठी 

पुरंदरचा तट मराठी

माय मराठी माय मराठी 


यवनांना दहशत मराठी 

फिरंग्यांना शह मराठी

दिल्लीवर भगवा मराठी 

माय मराठी माय मराठी


वि.स,वि.वा जगले मराठी

विंदा, नेमाडे जिणे मराठी

ज्ञानपीठ हो दिले मराठी

माय मराठी माय मराठी 


मनामनावर राज्य करी 

माय मराठी माय मराठी


📚🖋️ राहुल मोरे 

       ९४२१६१२९७९

Wednesday, January 7, 2026

Karmaveer Nana Baba

 


कर्मवीर नाना बाबा


दीनांचा उध्दार करण्या 

सर्वस्व तुम्ही अर्पिले

ज्ञानगंगेचे भगीरथ होऊनी

आयुष्य तुम्ही कष्टीले 

तुम्ही सर्वस्व अर्पिले....१


दीन दलितांचे तिमिर जावो 

त्यांच्या जीवनी प्रकाश लाहो 

यासाठी कणकण झिजले

तुम्ही सर्वस्व अर्पिले ....२


गरिबीचा वसा घेऊनी

विनोबांचे पाईक होऊनी 

साने गुरुजी शिकविले 

तुम्ही सर्वस्व अर्पिले....३


जात-पात धर्मपंथ 

यापलीकडे जाऊनी

मानवतेचे गुण गाईले

तुम्ही सर्वस्व अर्पिले....४


श्रमाने माणूस मोठा 

कर्माने माणूस मोठा 

हे मूल्य कृतीतून दाविले

तुम्ही सर्वस्व अर्पिले....५


गळ्यात पिशवी हातात काठी

झिजले तुम्ही स्नातकांसाठी

निस्वार्थ असे जीवन जगले

तुम्ही सर्वस्व अर्पिले....६


(प्रासंगिक - शिक्षण महर्षी नानासाहेब य ना चव्हाण यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त)


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Friday, January 2, 2026

Kavita गाव

 


             गाव

राम प्रहरी गावाकडं, एकच लगबग असायची

गाई वासराच हंबरन, बादलीला चरवी घासायची. 



दुधाच्या धारेचा तो मंजुळ आवाज, 

कान तृप्त करून जायचा

पशु पक्षांचा किलबिलाट, कसा मंद मंद चालायचा. 


विहिरी वरची मोट अन, मोटेची कुई कुई असायची 

हिरवीगार शेतं पाहून, नखऱ्या पाखऱ्या डोलायची.


नखऱ्या पाखऱ्याच्या तालावर, मोटकरी गाणं गायचा

थाळण्यातून वाहणारं पाणी, पाण्यान दांड भरून वहायचा


वाफ्या वाफ्यातून पाणी कसं, मातीला भिजवत रहायचं 

भिजलेल्या मातीचा सुगंध घेत, मन कसं भरून जायचं. 


आता मात्र... आता मात्र....


मोट नाही, नाडा नाही, नाही गाईच हंबरन 

दूध नाही, धार नाही, नाही मातीचा सुगंध


सारं कसं दिवसेंदिवस, चिराख होत गेलं 

शहरीकरणानं गावाचं, गावपण हिरावून नेलं.

शहरीकरणानं गावाचं, गावपण हिरावून नेलं....


📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Monday, November 3, 2025

Aaj Sarkha Ekant (Prem Kavita)

 


आज सारखा एकांत 

(प्रेम कविता) 


आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही 

जे सांगायचे होते, ते तुला कधी कळलेच नाही 

चार वर्षाची तपश्चर्या माझी, 

फळ मला कधी देणार होतीस ?

जन्मोजन्मीची खून गाठ म्हणे ही, 

बांधता बांधता या जन्मी बांधलीच नाही 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही 


जन्मोजन्मीचे तुझे हे रडगाणे 

ऐकता ऐकता कान ही इटले 

सांध सांधता हृदय ही फाटले 

गळा हार घालण्यासाठी हात उरलेच नाही. 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही 


दोघांच्या त्या सहवासात विर्जन 

निर्जन वाटेवरील तो दुरावा 

कसा हा तुझ्या माझ्या नशिबी आला 

नशिबाला दोष देण्यात वेळ कळलाच नाही. 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही. 


बरे असो त्वा भरतारी जीवन 

मजही सहानुभूती नको तुझी 

सुखी असो तू, हीच मनीषा माझी. 

एवढे सारे सांगून डोळे पाणवलेच नाही. 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही. 

जे सांगायचे होते ते तुला कधी कळलेच नाही.

 

आज सारखा एकांत कधी मिळालाच नाही.


 

📚🖋️ राहुल मोरे 

      ९४२१६१२९७

Sunday, November 2, 2025

Chatak Pakshi

 



चातक


पेर पेगु नारा

देतो हा बिचारा 

वाजवितो पावा 

करीतसे धावा "१"


एक एक थेंबासाठी

झाला कासाविस 

हरिनाम जप

करी रात्रंदिस "२"


वरुणाचा थेंब 

त्याचा आत्मा कोंब 

दाही दिशा मंदी 

उसळला डोंब "३"

 

पेरक्या ईनंती 

करी त्याची खरी 

न फुटे पाझर 

त्याची न्येत बुरी "४"

 

ये मेघा जोमानं 

दे रे जीवदान 

सैर भैर झालो 

पुरव तू आन "५"


वागनुक तूही 

अशी कशी आहे 

मी तर बिचारा 

अपराध साहे "६"



📚🖋️ राहुल मोरे 

९४२१६१२९७९

Kanya कविता

      कन्या इटूकले पिटूकले पावलं टाकत छुम छुम करीत येते दिवसभराचा क्षिणभाग  क्षणात पळवून नेते घरी आल्यावर सर्वात आधी  तीच असते दारात पप्पा आ...